अभिनेत्री दिप्ती कुडाळकर यांचा सत्कार.

👇Click and Listen

अभिनेत्री दिप्ती कुडाळकर यांचा सत्कार.

समाजौन्नती संघटना पेडणे शाखेतफै नाट्य अभिनेत्री दिप्ती कुडाळकर यांचा प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन मुरमुसे पासै येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर समाजौन्नती संघटनचे  पेडणे अध्यक्ष

विशांत कोरगांवकर, महेश चव्हाण, केरी गावच्या सरपंच धरती नागोजी, धृव कुडाळकर, आदि उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे नाट्य दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांनी यावेळी सौ. दिप्ती कुडाळकर याचे नाट्य श्रेत्रातील योगदान फार मोठे असल्याने सांगितले.

यावेळी समाजौन्नती संघटनचे मध्यवर्ती संघटनचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर याचा संदेश राजेश चव्हाण यांनी वाचून दाखवला.

याप्रसंगी विशांत कोरगांवकर यांनी प्रास्ताविक केले महेश चव्हाण यांनी स्वागत केले.

याप्रसंगी सत्कार मुर्ती दिप्ती कुडाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या   अध्यक्षतेखाली असलेले

पत्रकार भारत बेतकेकर यांचे समयोचित भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धृव कुडाळकर तर दामोदर कुडाळकर यांनी आभार मानले.

यावेळी गणेश वाडकर, अरविंद कोरगांवकर, सिद्धार्थ नागोजी भुषण कुडाळकर, केदार कुडाळकर, मनाली चव्हाण, विनीता कोरगांवकर आदी उपस्थित होते.

फोटो भारत बेतकेकर

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment