जायंटस ग्रुप ऑफ पर्वरी सहेली चा जायंट्स सप्ताह रामवडेश्वर संस्थान पर्वरी येथे संपन्न झाला. 

👇Click and Listen

जायंटस ग्रुप ऑफ पर्वरी सहेली चा जायंट्स सप्ताह रामवडेश्वर संस्थान पर्वरी येथे संपन्न झाला. 

या सप्ताह समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार भारत बेतकेकर उपस्थित होते. रामवडेश्वर देवस्थान चे अध्यक्ष रामदास नाईक, जायंट्स  गृप पर्वरी सहेली चा अध्यक्षा विधीती धुरी , प्रकल्प अधिकारी सुमित्रा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या सप्ताह निमित्त पत्रकार भारत बेतकेकर यांचा जायंट्स ग्रुप पर्वरी सहेली तर्फे रामदास नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी भारत बेतकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवस्थान चे अध्यक्ष रामदास नाईक यांनी जायंट्स ग्रुप पर्वरी सहेली करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

सप्ताह निमित्त कागदापासून बॅग कशा बनवावे याचे यावेळी प्रशिक्षण सरीता पै आंगले यानी जायंट्स सदस्य व महिलांन करून दाखवले. तसेच यावेळी पाच दत्तक मूलीना शिक्षणासाठी आर्थिक मदत जायंट्स गृप पर्वरी सहेली अध्यक्षा  विधीती धुरी यांच्या हस्ते देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पेडणेकर यांनी केले तर अध्यक्षा विधीती धुरी यांनी स्वागत केले. सुमित्रा नाईक यांनी आभार मानले.

फोटो बेतकेकर

जायंट्स गृप पर्वरी सहेली चा जायंट्स सप्ताह निमित्त उपस्थित भारत बेतकेकर, रामदास नाईक, विधीती धुरी व इतर.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment