सद्गुरू ब्रह्मेशानंद संस्कृत पाठशाळेचे करासवाडा पेडे येथे उद्घाटन

👇Click and Listen

सद्गुरू ब्रह्मेशानंद संस्कृत पाठशाळेचे करासवाडा पेडे येथे उद्घाटन

पेडणे: श्री मुंजेश्वर देवस्थान, पेडे येथे संत समाज करासवाडा व पेडणे यांच्या वतीने सद्गुरू ब्रह्मेशानंद संस्कृत पाठशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तारक आरोलकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी डॉ. तारक आरोलकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा पाया आहे. विविध धर्मग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध असून, संस्कृतमुळे वाड्मय आणि ललित साहित्याला उंची प्राप्त झाली आहे. ही भाषा टिकवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.” त्यांनी संस्कृतच्या उच्चारातील वैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकला, ते म्हणाले, काश्मीर असो वा तामिळनाडू, संस्कृत बोलणाऱ्यांचा उच्चार व स्वर एकसारखा असतो, हे या भाषेचे वैशिष्ट्य आहे. आणि संस्कृत शिक्षणाच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली.

या उद्घाटन सोहळ्यास रामकृष्ण राऊत, सुजान नाईक, नारायण नाईक, दिलीप पेडणेकर आणि सिद्धार्थ रेवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्कृत शिक्षणाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि संवर्धनासाठी सद्गुरू ब्रह्मेशानंद संस्कृत पाठशाळा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment