ईव्हीएम खुश आहे! दिल्ली निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पार्टीने आरोप केला नाही
दिल्ली विधानसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक ठरली, जिथे पराभवानंतर कोणत्याही पक्षाने ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नाही. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षांनी ईव्हीएममध्ये भाजपने काही छेडछाड केली असा कोणताही आरोप लावला नाही. त्यामुळे आज ईव्हीएमही खूप खुश असल्याचे दिसते.
माननीय अरविंद केजरीवाल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की, “आमचा पराभव कशामुळे झाला याचे विश्लेषण करू, पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी काम करू आणि जनतेत पुन्हा विश्वास निर्माण करू.” त्यांनी भाजपच्या विजयाचे अभिनंदन करत, दिल्लीच्या विकासासाठी चांगली कामे करावीत अशी शुभेच्छाही दिल्या. तसेच, “दिल्लीमध्ये आता एक बळकट विपक्ष उभा राहील,” असे ते म्हणाले.

दरम्यान, ईव्हीएम मशीन जणू गालातल्या गालात हसत आहे आणि म्हणत आहे, “आज कोणत्याही पक्षाने माझ्यावर संशय घेतला नाही, याचा मला आनंद आहे!” विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकून, त्यांच्याशी दृढ नातं निर्माण करणे गरजेचे आहे. सत्ता परिवर्तन हे ईव्हीएमचे काम नसून, जनतेचा विश्वास जिंकण्याचे आहे.
भारतात सुदृढ लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांनी पूर्ण ताकदीने जनसेवेला वाहून घेतले पाहिजे. भारताचा विकास धर्म, जात, पंथ यावर नाही, तर सर्वांना एकत्र आणून गरिबी नष्ट करण्यात आहे. चला, हातात हात घालून भारताच्या विकासासाठी कार्य करूया! जय हिंद!










