महाराष्ट्र बरोबर देशभरात काँग्रेसचे नेतृत्व बदल बदलाचे संकेत.
काँग्रेस पक्षात मोठ्या नेतृत्व बदलाची घोषणा करण्यात आली आहे. मा. काँग्रेस अध्यक्षांनी श्री. हार्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच, पक्षाने माजी अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याशिवाय, मा. काँग्रेस अध्यक्षांनी श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
गोव्यातही नेतृत्व बदलाचे संकेत
सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्यात देखील येत्या दोन-तीन महिन्यांत गोवा प्रदेश काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा बदल निश्चित असल्याचे बोलले जात आहे. गोव्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणते नाव चर्चेत येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाने आतापर्यंतच्या निवडणुकांतील पराभवाचा अभ्यास सुरू केला असून, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योग्य संघटनात्मक रचना आणि सक्षम नेतृत्व यामुळे काँग्रेस पक्ष तळागाळात बळकट होईल, असा पक्षनेत्यांचा विश्वास आहे.
आगामी काळात पक्षाच्या कार्यपद्धतीत आणखी मोठे बदल होण्याची शक्यता असून, हे नेतृत्व बदल काँग्रेसच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.











