गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट सांगितले की, “मैं भी हूं, मोदी का परिवार.”
मापसा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले, की मोदींनी गोव्याच्या विकासासाठी माझ्या कालखंडामध्ये भरपूर निधी दिला त्यामुळे मी गोव्याच्या विकासासाठी बरीच कामे करू शकलो. मोपा एअरपोर्ट असो हायवे असो आणि इतर विकासात्मक कामासाठी मोदींनी गोव्यासाठी भरभरून दिले, आज देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. आणखीन पाच वर्ष देशाचे पंतप्रधान हे मोदीच असले पाहिजे, याकरिता गोव्यातील दोन्ही ही उत्तर मतदारसंघ व दक्षिण मतदारसंघ या ठिकाणच्या दोन्ही उमेदवारांना गोव्यातील जनतेने बहुमताने निवडून आणावे याकरिता मी गोव्याच्या जनतेला विनंती करत आहे. असे त्यांनी यावेळी उद्गार काढले. त्याचबरोबर रमाकांत खलप हे माझे अत्यंत चांगले मित्र असून तेही मला भेटून गेले, असे त्यांनी यावेळी सांगितले भारताच्या विकासासाठी मोदी हा एक पर्याय आहे. म्हणून मी यावेळी गोव्याच्या जनतेला मोदींसाठी श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपे यांना निवडून देण्यासाठी जनतेला नम्रपणे विनंती कर करत आहे. मोदींनी दिलेल्या विकास निधीची पोचपावती म्हणून आपण गोवेकरांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी गोव्याच्या दोन्ही भाजपा च्या जागा निवडून द्याव्यात असे आव्हान करतो, असे ते यावेळी बोलले.











