जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला.

👇Click and Listen

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला.

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे, तर दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला सुरनकोटच्या सनई गावात झाला.

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान एक जवान शहीद झाला, तर दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर तीन जवानांची प्रकृती स्थिर आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला होता, दहशतवाद्यांनी हा हल्ला सुरनकोटच्या सनई गावात केला. मात्र, भारतीय लष्कर आणि पोलिसांचा अतिरिक्त ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या स्थानिक तुकडीने परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी हवाई दलाची वाहने शाहसीतारजवळील एअरबेसच्या आत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत.

घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे गरुड विशेष दलही तैनात करण्यात आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस जवानांनी शोध मोहिम सुरू केली आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment