अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन.
अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मद्य धोरण घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन मंजूर केला आहे. कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला, असून त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. आम आदमी पक्षाच्या प्रमुखांसाठी हा मोठा दिलासा आहे, कारण लोकसभा निवडणुका सुरू आहेत.
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची लोकसभा निवडणुकीचे (लोकसभा निवडणूक २०२४) निकाल ४ जून रोजी जाहीर होईपर्यंत अंतरिम जामीन देण्याची विनंती फेटाळली. केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी नाही.











