SBI FD च्या व्याजदरात वाढ, स्टेट बँक ऑफ इंडियाची घोषणा.
2 कोटी रुपयांपर्यंतच्या विविध कालावधीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन एफडी दर आज 15 मे पासून लागू झाले आहेत. SBI ने 46 दिवसांवरून 179 दिवस, 180 दिवस ते 210 दिवस आणि 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 0.25 ते 0.75 टक्क्यांनी वाढवले आहेत. SBI ने 27 डिसेंबर 2023 रोजी एफडीवरील व्याजदरात शेवटची वाढ केली होती. 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर व्याज दर 6.50 टक्के आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देते. SBI चा ज्येष्ठ नागरिक FD वर 4 ते 7.5 टक्के व्याजदर आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याजदर 7.50 टक्के आहे. त्याच वेळी, SBI ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर 7.5 टक्के व्याज दर देखील देत आहे.











