इस्रोच्या आदित्य-एल1 ने टिपले, मोठे सौर वादळ..!
सूर्याने इतिहासातील सर्वात शक्तिशाली सौर लहरी सोडल्या आहेत. जो इस्रोच्या आदित्य-एल1 ने टिपले आहे. ही दहावी भयानक सौर लहरी होती. ज्याचा जगभरातील दळणवळण यंत्रणा, उपग्रह, पॉवर ग्रिड आणि नेव्हिगेशन प्रणालींवर परिणाम होऊ शकतो. यावरून आपल्याला समजेल की सुर्याची दाहकता किती आहे.
सूर्याने पृथ्वीच्या दिशेने सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली सौर लहरी फेकली आहे. हा X8.7 तीव्रतेचा स्फोट होता. अर्ध्या शतकात प्रथमच सूर्यापासून एवढी मजबूत सौर लहरी निघाली आहे. तेही त्याच ठिकाणाहून जिथे ११ मे ते १३ मे दरम्यान दोनदा स्फोट झाले. इस्रोच्या सूर्ययान म्हणजेच आदित्य-एल1 अंतराळयानानेही याच काळात सूर्याकडून येणाऱ्या सौर लहरी टिपल्या.











