न्यूव वाडा मोरजी येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात यश.

👇Click and Listen

न्यूव वाडा मोरजी येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात यश.

आज सकाळी न्यूव वाडा मोरजी येथे एका विहिरीमध्ये बैल पडल्याची बातमी अग्निशामक दलाला मिळताच, अग्निशामक दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन लोकांच्या मदतीने बैलाला जिवंत विहिरीतून बाहेर काढण्यास त्यांना यश आले. या मोहिमेत हवालदार फटू नाईक, चालक प्रमोद गवंडी, जवान सर्वेश पार्सेकर, इंद्रकुमार परब, अमित सावल ,व स्थानिक वैभव भिवशेट शेटगावकर विग्नेश फोनडेकर ,अनिष शेटगावकर यांनी चांगले सहकार्य केले. यामुळे बैलाला जीवनदान मिळाले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment