सीएम तमांग यांच्या पक्षाला सिक्कीममध्ये दणदणीत विजय, विरोधकांचा सुपडा साफ.
सिक्कीम विधानसभा निवडणूक निकाल 2024, सिक्कीममध्ये सीएम प्रेमसिंग तमांग यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) 32 पैकी विक्रमी 31 जागा जिंकल्या आहेत.
सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा म्हणजेच SKM पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. राज्यातील 32 जागांपैकी SKM ने 31 जागांवर मोठा विजय मिळवला आहे, तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच SDF ने एक जागा जिंकली आहे.सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) सलग दुसऱ्यांदा मोठा विजय मिळवला आहे. भाजप, काँग्रेस आणि सिटीझन ॲक्शन पार्टी- सिक्कीम (CAP-S) यांना त्यांच्या खात्यात एकही जागा मिळाली नाही. सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले. विधानसभेबरोबरच सिक्कीमच्या एका लोकसभेच्या जागेसाठीही मतदान झाले, ज्याचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे.










