श्रीलंकेत मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, 13 ठार, 7 बेपत्ता.
श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 400 घरांचे नुकसान झाले आहे.
श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे सोमवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पूर आणि पावसाशी संबंधित इतर घटनांमध्ये किमान 13 लोकांचा मृत्यू झाला आणि इतर 7 जण बेपत्ता आहेत, असे ते म्हणाले. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.










