एक्सप्रेस ट्रेनला, मालगाडीने मागून दिली धडक, डब्बे एकमेकांवर.

👇Click and Listen

एक्सप्रेस ट्रेनला, मालगाडीने मागून दिली धडक, डब्बे एकमेकांवर.

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. अपघातानंतर एक्स्प्रेस ट्रेनचे बोगी एकमेकांवर आदळले.

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कांचनजंगा एक्सप्रेसला न्यू जलपाईगुडीच्या रंगपानी स्टेशनजवळ मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते. कांचनजंगा एक्सप्रेस आसाममधील सिलचरहून सियालदहला जात होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, दार्जिलिंगमधील रेल्वे अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. तसेच पीएम मोदींनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. पीएम मोदी म्हणाले की, मी अपघाताबाबत अधिकाऱ्यांशी बोललो आणि परिस्थितीचा आढावा घेतला. बाधितांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण यांनी अपघातस्थळी जात आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment