मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अमित वसंत शेटगावकर यांची बिनविरोध निवड
मोरजी (प्रतिनीधी )
मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाची सभा मावळते अध्यक्ष नाना उर्फ चद्रो दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला मागच्या सभेचा इतिवृत्तान्त वाचून कायम करण्यात आला. जमा खर्चाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर नवीन तीन वर्षासाठी ट्रस्टची समिती निवडण्यात आली की खालील प्रमाणे .
मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या पुढच्या तीन वर्षासाठी नवीन समिती निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून अमित वसंत शेटगावकर उपाध्यक्ष सदानंद मोरजकर सचिव संजय सावंत संयुक्त सचिव सुभाष शेटगावकर खजिनदार श्री कृष्णा आस्कावकर संयुक्त खजिनदार शिवनाथ शेटगावकर यांची निवड केली तर घनश्याम मोरजकर, सोनू शिटगावकर ,उदय आजगावकर ,जगन्नाथ वाडजी व हरि नायक यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
फोटो.मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ नवीन कार्यकारिणी अध्यक्ष अमित वसंत शेटगावकर व इतर











