सरपंच प्रशांत नाईक मार्गदर्शनाखाली, मांद्रे पंचायत ग्रामसभा आज पार पडली,
मांद्रे पंचायत ग्रामसभा आज पार पडली, यावेळी मासळी बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली, मांद्रे येथे मैदान कधी तयार होणार याबाबत स्थानिकांनी प्रश्न विचारले तसेच अनेक विकास कामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसभेत सरपंच प्रशांत नाईक व राजेश मांद्रेकर यांनी स्वखर्चाने प्राथमिक शाळा सुरू केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.










