*रामनाथी, फोंडा येथे आजपासून ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !*
फोंडा – हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदा १२ वे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे. महोत्सवाचे २४ जून या दिवशी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
*संत आणि महनीय व्यक्ती यांच्य हस्ते होणार महोत्सवाचे उद्घाटन !*
या उद्घाटन सत्रात डॉ.चारुदत्त पिंगळे, महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, डॉ.नीलेश नीलकंठ ओक आणि श्री. रणजित विक्रम सावरकर यांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ या विषयावर बीज वक्तव्य, तसेच आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचे ‘धर्मांतर रोखण्यासाठी आदिवासी भागात केलेले कार्य’, डॉ. नीलेश नीलकंठ ओक यांचे ‘ विश्वगुरु भारताचे बलस्थान : ‘सनातन हिंदू धर्म ’ आणि श्री. रणजित विक्रम सावरकर यांचे ‘हिंदू टू हिंदू बिझनेस’ला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे’ या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या अधिवेशनाला त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून स्वामी ब्रह्मस्वरुपानंद महाराज, घाना येथून श्रीनिवास दास, नेपाळमधून श्री. शंकर खराल, श्री. त्रिलोक ज्योती श्रेस्ता, श्री. जगन्नाथ कोईराला, श्री. लक्ष्मण पंथी, श्री. संतोष शहा, इंडोनेशिया येथून श्री. धर्म यशा येणार आहेत. यांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नर्मदाशंकरपुरी महराज, भारत सेवाश्रम संघाचे पूर्वोत्तर क्षेत्राचे मुख्य संयोजक स्वामी साधनानंद महाराज, इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महनीय ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्रातील अनेक वारकरी उपस्थित रहणार आहेत,आदी संतांची वंदनीय उपस्थितीही लाभणार आहे.










