मोपात वीज चोरी प्रकरणी दक्षता खात्याचा छापा, बजावला  6,48,644 रुपये दंड.

👇Click and Listen

मोपात वीज चोरी प्रकरणी दक्षता खात्याचा छापा, बजावला  6,48,644 रुपये दंड.

पेडणे (प्रतिनीधी )

मोपा गावठण वाडा येथील एक सधन नागरीक आत्माराम राजाराम परब यांच्या घरावर वीज खात्याच्या दक्षता खात्याने धाड घालुन वीज चोरी केल्या बद्दल त्याना सुमारे 6 लाख 48 हजार 644 रुपये दंड ठोठावला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की एका अज्ञात व्यक्तींने मोपा गावातील वीज खात्यातील एका कर्मचार्याची विज खात्याच्या दक्षता खात्याकडे चोरुन वीज वापरत असल्याची तक्रार केली होती त्या नुसार दक्षता खात्याचे अधिकारी 20 जुन रोजी अचानक सदर व्यक्ती च्या घराकडे येउन तपासणी केली परंतु तीथे काहीही न सापडल्याने त्यानी रस्ता लगत असलेल्या एका आलीशान बंगला वजा घराकडे आपला मोर्चा वळविला त्या घराची तपासणी केली असता तळ मजल्यावरुन बाय पास करून वीज प्रवाह वरच्या मजल्यावर नेली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले दक्षता अधिकार्यानी घर मालक आत्माराम परब याना ताब्यात घेउन संपुर्ण घराची तपासणी करणार असल्याचे सांगितले व तसा प्रकारची माहिती मोपा पोलीस स्टेशन ला दिली

त्या नुसार मोपा पोलीस सांचे एक पथक मोठ्या लवाजम्यासह घटना स्थळी दाखल झाले पोलिसाच्या उपस्थितीत संपुर्ण घराची तपासणी केली असता आत्माराम परब याच्या घरातील तळ मजल्यावर वीज कनेक्शन चा मीटर बाँक्स आहे व तेथून चोरट्या मार्गाने वरच्या मजल्यावर कंसीलींग करुन बायपास द्वारे वीज पुरवठा केला होता या मजल्यावर चारपाच वातानुकूलित यंत्रणा व महागडे विद्युत उपकरणे वापरली जात होती वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या मोटरीज पण व घरगुती वापराची अनेक वीद्युत उपकरणे वापरली जात होती

या बायपास मुळे फक्त तळ मजल्यावर वापरली जाणार्या वीजेचे मीटर रीडिंग होत होते व तळ मजल्यावर नगण्य उपकरणे होती वीजेचा जास्त वापर वरच्यावर मजल्यावर होत होता ज्याचे रीडीग होतच नव्हते म्हणजे वरच्या मजल्यावर च्या वीजेचा वापर जास्त होत होता ती सर्व वीज फुकट वापरली जात होती

संपुर्ण घराची तपासणी करुन पोलीसा समक्ष पंचनामा करुन दक्षता अधिकार्यानी संपुर्ण घराचे वीज कनेक्शन सील केले व आत्माराम परब याना वीजेची चोरी केल्या प्रकरणी सुमारे 6 लाख 48 हजार 644 रुपयांचा दंड ठोठावला हा दंड एका वर्षाचाप्रथमीक असुन या पुढे त्याची चौकशी करुन पुढील कारवाही करण्यात येणार आहे

या चौकशीत आत्माराम परब हे या घरात कधीपासून रहात आहेत त्याना वीज पुरवण्यासाठी आवश्यक ते दाखले कोणी दिले आहेत वीजेची फीटींगकाम कोणी केले आहे याची चौकशी करुन पुढील दंडात्मक कारवाई होणार आहे

या परिसरात हा वीज चोरीचा पहिलाच प्रकार आहे सामान्य माणसाने वीजेचेबील आर्थिक टंचाई कीवा कुठल्याही कारणास्तव भरायचे राहीले तर तात्या कडुन त्याना नोटीसा पाठवल्या जातात वीज प्रवाह बंद केला जातो एखाद्या कुटुंबाने घर जरासे वाढविले व त्याला कमी बील आले तर त्याची चौकशी केली जाते परंतु या आलीशान बंगल्यात महागडी विदुर उपकरणे बाहेरुन दिसत असुन सुद्धा गेली कित्येक वर्षे नगण्य असे बील का येते याची आजवर चौकशी कशी केली नाही असा सवाल सामान्य नागरिक करीत आहेत

दरम्यान या प्रकरणा बदल परिसरातील नागरिकांमध्ये संता व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरीकां मध्ये होत आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment