उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर स्थगिती. करावा लागेल तिहार जेलमध्ये मुक्काम.

👇Click and Listen

उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर स्थगिती. करावा लागेल तिहार जेलमध्ये मुक्काम.

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही. आता केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून केजरीवाल यांच्या जामिनावर स्थगिती कायम ठेवली आहे. या निर्णयानंतर केजरीवाल सध्या तिहार तुरुंगातच राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम राहणार असल्याचे न्यायालयाने आज स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment