विरोधी पक्ष नेता कसा असावा हे, आ. युरी यांनी आ. मायकल लोबो यांच्याकडून शिकावे.

👇Click and Listen

विरोधी पक्ष नेता कसा असावा हे, आ. युरी यांनी आ. मायकल लोबो यांच्याकडून शिकावे.

काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्याने आमदार मायकल लोबो यांच्याकडून जनतेचे प्रश्न विधानसभेत कशाप्रकारे मांडले जातात हे जरा शिकावे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरू झाली काही गदारोळ वगळता कामकाज योग्य पद्धतीने चालले. विरोधी पक्षनेते हे जनतेची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडत आहेत, असं सोमवारी जाणवलं ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये लोककल्याणकारी प्रश्न किंवा जाब हा सरकारला विचारला जावा अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षाकडून घेतली जात आहे, असं दिसत नव्हतं.

उलट सरकार मध्ये असणारे, आमदार मायकल लोबो यांनी जनतेची बाजू सरकारमध्ये राहून सरकार पुढे मांडली हे एक कालच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची जमेची बाजू मानावी लागेल.

कारण ज्या प्रकारे त्यांनी कला अकादमीचा प्रश्न सरकार पुढे मांडला, गोव्यातील कलाकारांना न्याय मिळावा व जे मंत्री स्वतः कलाकार आहेत, आणि त्यांच्याकडून लोकांच्या खूप आशा आहेत, एक चांगल्या प्रकारे गोव्याला एक कलाकारांसाठी कला अकादमी सारखे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यामध्ये झालेली चूक त्यांनी सरकार पुढे मांडली.

तसेच गोव्यातील टॅक्सी ड्रायव्हरच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मानासाठी व न्यायासाठी त्यांनी सरकार पुढे त्यांच्या व्यथा मांडल्या.

त्याचप्रमाणे आयआयटी सारखा विषय अजून प्रलंबित आहे. याबाबत त्यांनी सरकारला सूचना दिल्या जणू ते सरकारला जाब विचारत आहेत, की काय अशा पद्धतीने त्यांनी सौम्यवार सरकारला विचारणा केली. लोककल्याणकारी काही उपक्रम असतील ते लवकरात लवकर लोकांकरिता समर्पित व्हावेत या भावनेने सरकारने काम केले पाहिजे, अशी विचारणा त्यांनी सरकारला केली.

खरंतर पहिल्या दिवशी, विपक्ष नेता कोण हा एक प्रश्न पडला होता. विपक्ष नेत्याने विपक्ष नेत्यासारखे काम केले दिसले नाही. सरकारमध्ये राहून आमदार मायकल लोबो यांनी जनतेचे प्रश्न सरकारला विचारले खरं तर हा एक चांगला संदेश आहे. पण विरोधी पक्ष नेत्याने लोकांचे प्रश्न विधानसभेत कसे मांडावेत याबाबत आमदार मायकल लोबोच्याकडून काहीतरी शिकावे असे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या संदर्भात म्हणावे लागेल. ‌

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment