गुजरातप्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. येथे पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शंकर ललवाणी आणि अक्षय बम व आणखी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. जे वेगवेगळ्या पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. भाजपाचा प्लॅन असा आहे, की सुरत प्रमाणे आता बाकी उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास विनंती करणे व सुरत प्रमाणे परत एकदा मध्य प्रदेश इंदोर मध्ये भाजपाचा दुसरा विजय घडवून आणण्याची तयारी भाजपाची चालू आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आणि 29 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसला काही खबर मिळण्यापूर्वीच कैलाश विजयवर्गीय यांनी हे ‘ऑपरेशन लोटस’ केले. इंदूरमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.










