राजधानी दिल्ली आणि नोएडासह एनसीआर 100 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटची ईमेल द्वारे धमकी.
शाळांमध्ये डी.पी.एस., मा मेरी आणि एमिटीसह अनेक नामांकित शाळांचा समावेश आहे. सकाळी ईमेल आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस व बॉम्बशोधक पथक, श्वानपथक अँड अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले.
पोलिसांनी तत्काळ सर्व शाळांचे कॅम्पस रिकामे केले आणि शोध मोहीम सुरू केली. त्याचवेळी शाळा व्यवस्थापनाने याबाबत पालकांना संदेश पाठवून मुलांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानंतर पालकांमध्ये घबराट पसरली होती. मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी ते शाळेत पोहोचू लागले.
दिल्ली पोलिसांनी आज शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या धमक्यांवर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी प्रोटोकॉल नुसार अशा सर्व शाळांची कसून चौकशी केली आहे. मात्र, आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. हे कॉल्स बनावट असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांनी लोकांना घाबरू नये आणि शांतता राखण्याची विनंती केली आहे.
या प्रसिद्ध शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीदिल्लीतील द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस), मदर मेरी स्कूल, पूर्व दिल्लीतील मयूर विहार, संस्कृती स्कूल आणि पुष्प विहार येथील एमिटी स्कूल यांनाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. याशिवाय छावला येथील सेंट थॉमस, सरिता विहारचे जीडी गोएंका, बाबा हरिदास नगरचे एव्हरग्रीन पब्लिक स्कूल आणि द्वारकाच्या सचदेवा ग्लोबल स्कूललाही धमक्या आल्या आहेत. दिल्लीशिवाय नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कूललाही धमकीचा ईमेल आला आहे.
![]()










