गोव्यामध्ये भाजपाचे दोन्हीही उमेदवार जिंकून येऊ शकतात, अशा पद्धतीचा लोक कौल. उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन मतदार संघातील विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानानुसार असे दिसून येते की, खरोखर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, ज्या पद्धतीचा मतदानाचा टक्का त्या, त्या मतदारसंघांमध्ये दिसत आहे. यावरून असं दिसतं की भाजपाचे दोन्हीही उमेदवार निवडून येऊ शकतात.
काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही मध्ये विपक्ष हा एक महत्त्वाचा घटक असतो. जेणेकरून सत्ता पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विपक्ष हा महत्त्वाची भूमिका पार पडत असतो. ज्या देशांमध्ये विपक्षच कमजोर असेल, तर त्या देशाची लोकशाही नष्ट होण्याची भीती असते.
जसे देशात काँग्रेसला कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्याच प्रमाणे गोव्यात देखील काँग्रेसला एक कणखर नेतृत्वाची गरज आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांना काँग्रेसच्या नावावरती लोक मतदान करतात. हेच काँग्रेसमधील नेते ज्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास मैदानात उतरतात त्यावेळी काही नेत्यांची जमानात रक्कम देखील जप्त होते. अशी लोकप्रियता असणारे काही नेते. अशा नेत्यांना जिंकून येण्यासाठी काँग्रेस पक्षाची गरज आहे. पण काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी, गोव्याच्या घराघरात पोहोचवण्यासाठी किती नेते मनापासून काम करतात हा “एक प्रश्नचिन्ह नसणारा एक प्रश्न आहे.” म्हणून काँग्रेसला इमानदारीने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
गोव्यामध्ये अँटी बीजेपी व अँटी काँग्रेस असे दोन कट्टर मतदार गट आहेत. आतापर्यंतच्या निवडणूक पाहिल्यास आपल्या निरीक्षणास येईल, खास करून हे दोन गट उमेदवारांचा विजय निश्चित करतात. काही लोकांना यामध्ये तथ्य वाटणार नाही, पण हि एक वास्तविकता आहे, हे नक्की.
गोव्यातील जनतेला 100 पैकी 100 गुण दिलेच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये गोव्यातील जनता एक आगळावेगळा पद्धतीने भाग घेते व खऱ्या अर्थाने लोकशाहीला अभिप्रेत असे काम करते. अशा जनतेला मानाचा मुजरा. लोकसभा निवडणूक लोकउत्सवाप्रमाणे झाली पाहिजे याकरिता गोव्यातील लोकांनी घेतलेला सहभाग हा अभूतपूर्व आहे.











