मयडे, बार्देश येथील केनडी डीसा (45) या इसमाने राहत्या घराच्या पाठीमागील विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली, हा प्रकार दिनांक 10 रोजी सकाळी उघडकिस आला.
मयत केनडी डीसा याची पत्नी व मुलगी मुंबईला गेलेली असून तीन चार दिवस घरी एकटाच होता. आज सकाळी शेजाऱ्यांना त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसला. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करतात गोमाकोद पाठवून दिला आहे.











