चौथ्या टप्प्यात ही मतदानाची टक्केवारी कमी, याचा कोणत्या पक्षाला फायदा तर कोणत्या पक्षाला नुकसान चला तर मग जाणून घेऊया. 

👇Click and Listen

चौथ्या टप्प्यात ही मतदानाची टक्केवारी कमी, याचा कोणत्या पक्षाला फायदा तर कोणत्या पक्षाला नुकसान चला तर मग जाणून घेऊया.

कोणत्या टप्प्यात किती मतदान.

मतदान.     2019.          2024.

टप्पा 1.    69.96          66.14

टप्पा 2.      70.09          66.71

टप्पा 3.       66.79         65.68

चरण 4.        69.12        63.89

अंतिम आकडे येणे बाकी आहे

2019 च्या तुलनेने 2024 च्या मतदान टक्केवारी मध्ये झालेली घसरण ही काय दर्शवते, या कमी झालेल्या मतदानाचा तोटा भाजपाला किती होऊ शकतो, व झाला तर फायदा किती होऊ शकतो आज आपण याबद्दल चर्चा करू. त्याचबरोबर विपक्ष ला याचा फायदा किती होऊ शकतो व नुकसान किती होऊ शकते हेही जाणून घेऊया

एकूण झालेल्या मतदाना वरून असे दिसते की 2019 च्या निवडणुकीमध्ये एनडीए चे एकूण निवडून आलेले उमेदवार यांच्या संख्येमध्ये एक तर 15% घट होऊ शकते किंवा 15% वाढ होऊ शकते. या निवडणुकीमध्ये कोणाचा मतदानासाठी बाहेर पडला नाही याचा जर विचार केल्यास भाजपाकडे निवडणूक यंत्रणा खूप मजबूत असल्याने ते आपला मतदार पोलिंग बूथ पर्यंत पोहोचवतातच पण विपक्ष म्हणजे इंडिया यांनी आपला मतदार पोलिंग बूथ पर्यंत पोहोचविले का?

2019 मध्ये एनडीएच्या 352 उमेदवार निवडून आले होते, यात एक तर 15% घट किंवा 15% वाढ होईल, याचा विचार केला तर एनडीए एक तर 300 जागांवर निवडून येऊ शकते किंवा 404 निवडून येऊ शकतात.

15% घट किंवा वाढ याची कारणे काय आहेत .

सरकार विरुद्ध मुद्द्यांचा अभाव. सरकार विरुद्ध मुद्दा तयार करण्यात विपक्ष अपयशी.

विपक्षाची कमकुवत निवडणूक यंत्रणा.

सरकार विरुद्ध आक्रमकतेचा अभाव.

विपक्षांमध्ये एकजूट व एक वाक्यतेचा अभाव.

नियोजन विहीन प्रचार प्रसार माध्यमाचा वापर.

मुख्य म्हणजे चेहऱ्याचा अभाव. म्हणजेच नेता विहीन प्रचार.

मोदींची लोकप्रियता.

भाजपाकडे असणारी मजबूत निवडणूक यंत्रणा

सरकारचा लाभार्थी वर्ग

सरकारची हिंदुत्ववादी ओळख.

पन्ना प्रमुख ही भाजपाची मोठी ताकद.

नियोजनबद्ध प्रचार प्रसार माध्यमांचा वापर.

राम मंदिर, आर्टिकल 370, युसीसी, सी ए ए हे मुद्दे या निवडणूक मध्ये कामाचे ठरू शकतात.

असे बरेच मुद्दे आहेत जे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरू शकतात. 15% एनडीएच्या उमेदवारांमध्ये घट किंवा वाढ ठरू शकते याची ही कारणे आहेत. जरी मतदाराने विपक्षीच्या बाजूने कौल दिला तरी एनडीए सरकारमध्ये येणार हे नक्की. जास्तीत जास्त 15% वाढ किंवा घट हे या मतदानाच्या कौलानुसार स्पष्ट दिसते.

या मतदानाच्या कौला वरून असे दिसून येते की “अब की बार मोदी सरकार” या तो 300 पार या 400 पार.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment