मेड इन चांदणी चौकच स्पर्धा करु शकेल मेड इन चायनाशी : राहुल गांधी यांनी केले जनतेला आव्हान.

👇Click and Listen

मेड इन चांदणी चौकच स्पर्धा करु शकेल मेड इन चायनाशी : राहुल गांधी यांनी केले जनतेला आव्हान.

लोकसभा निवडणूक 2024: दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सत्तेत आलो तर तरुणांना पहिली नोकऱ्या देऊ. ‘ नोकरी पक्की योजने’ अंतर्गत तरुणांना रोजगार देणार.

खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीतील जाहीर सभेत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीसाठी मते मागताना हात व झाडू मतदान करण्याचे सांगितले. आपले सरकार सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम अग्निवीर योजना बंद करू, असे राहुल गांधी म्हणाले. जीएसटी सुलभ करण्यात येणार आहे. जीएसटीमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे कर नसतील, फक्त एकच कर असेल आणि तोही किमान कर असेल. चांदणी चौक आणि देशातील छोट्या व्यापाऱ्यांना बँका कर्ज देणार आहेत. “मेड इन चांदणी चौकच स्पर्धा करू शकेल, मेड इन चायनाशी असे त्यांनी सांगितले.

चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात ही जाहीर सभा झाली. अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. या तीन जागांवर काँग्रेस दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत चांदणी चौकातील उमेदवार जयप्रकाश अग्रवाल, कन्हैया कुमार ईशान्य दिल्ली आणि उत्तर- उदित राज, पश्चिम दिल्लीचे उमेदवार उपस्थित होते. राहुल यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे, व दिल्लीच्या ७ तीन जागां निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले, आणि ते म्हणाले दिल्ली आणि देशात कोणते कुटुंब दारिद्र्यरेषे खाली येते, त्यांची संपूर्ण यादी तयार केली जाईल. आणि प्रत्येक अशा कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये दिले जातील. असे ते जाहीर सभे वेळी बोलले.

जर देशाला प्रगती पथावर न्यायचे असेल व चायना सारख्या देशाला टक्कर द्यायची असेल तर “मेड इन चांदणी चौकच” स्पर्धा करू शकेल “मेड इन चायनाशी.” अशाप्रकारे त्यांनी जनतेच्या मनामध्ये जोश भरला.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment