इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर कोसळले, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. 

👇Click and Listen

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर कोसळले, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. अपघात स्थळाचे ठिकाणाची माहिती मिळाली आहे. इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, इब्राहिम रायसी या अपघातात पूर्णपणे सुरक्षित आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यात हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष रायसी अझरबैजानहून इराणला परतत होते. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित होते. अपघातस्थळाचे ठिकाण कळले आहे. उत्तर-पश्चिम इराणमधील जोल्फा भागातील जंगलात हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर इराणचे लष्कर बचाव कार्यात गुंतले आहे.

इराण व इस्रायल सोबतच्या युद्धामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या नांव चर्चेत आले होते. त्यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर अपघाताच्या वृत्तानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या जवळचे कट्टरपंथी धर्मगुरू इब्राहिम रायसी यांची जून 2021 मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. त्यापूर्वी त्यांनी इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख (2019-21) म्हणून काम केले होते.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment