स्वाती मालीवाल प्रकरणांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प का : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “आप च्या स्वाती मालीवाल यांच्याशी आता ज्या प्रकारे वागते आहे, तेच कुमार विश्वास यांच्यासोबतही केले गेले होते.”
भाजप नेते प्रमोद सावंत म्हणाले, “मी जेव्हा दिल्लीत लोकांना भेटतो तेव्हा ते मला विचारतात की अरविंद केजरीवाल 9 दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणात काहीच का बोलत नाहीत. केजरीवाल यांचे मौन सर्व काही सांगून जाते.”

ते पुढे म्हणाले, “आप पार्टी आता दिल्ली विरोधी आणि महिला विरोधी पक्ष बनला आहे. संजय सिंह पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यांनी स्वाती मालीवाल प्रकरण स्वीकारले. तीन दिवसांनी अरविंद केजरीवाल विभव कुमार यांना त्यांच्या कारमधून लखनऊला घेऊन जातात. जर विभव कुमारचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही मग त्याने फोन फॉर्मेट का केला?
विभव कुमार यांचा उल्लेख करण्यात आला प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज गायब आणि विभव कुमार तिथे लपवून ठेवल्याचे दिसून आले, या प्रकरणात केजरीवाल यांचा हात आहे.











