भाजीपाला उत्पादनामध्ये गोवा राज्याची स्वयंपूर्णते कडे वाटचाल.

👇Click and Listen

भाजीपाला उत्पादनामध्ये गोवा राज्याची स्वयंपूर्णते कडे वाटचाल.

भाजी उत्पादनात गोवा राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रीडॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील शेतकऱ्यांना सरकारतर्फे अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

गोवा राज्यासाठी दर दिवशी लागणाऱ्या भाजीची मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी खाते व फलोत्पादन महामंडळातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. गोवा राज्यात दर दिवशी भाज्यांच्या मागणीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. गोव्यातील साधारण ११८७ शेतकरी दर दिवशी लागणारी भाजी गोव्यात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गोव्यातील भाज्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी युवा पिढीने भाजी उत्पादनात आपले कॅरियर केल्यास भविष्यात गोवा राज्यात ६० ते ७० टक्के भाजी उत्पादन घेणे शक्य होणारआहे गोव्यातील १० अग्रेसर शेतकरी विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेऊन दरवर्षी ६० ते १० लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न घेत असतात. सरकारकडून बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे सर्व भाजी फलोत्पादन महामंडळाकडे पाठवली जाते. दर महिन्याला प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन केलेल्या भाज्यांचा जास्तीत जास्त हमीभाव मिळावा म्हणूनप्रयत्न करण्यात येत आहे.फलोत्पादन महामंडळ भाजी उत्पादन केलेल्या शेतकऱ्याकडून सर्वसाधारण५० रुपये किलो दराने भाजी विकत घेऊन फलोत्पादन महामंडळाच्या दुकानातून २० रुपये किलो दराने भेंडी व चिटकी भाजी विकली जाते. शेतकऱ्यांना भाजीसाठी जास्तीत जास्त हमीभावमिळावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.

बेळगाव भाजी मार्केटच्या दराप्रमाणे गोव्यातील शेतकऱ्यांना भाज्यांचा हमीभाव देण्यात येतो. बेळगाव भाजी मार्केटमध्ये भेंडी व चिटकी या भाज्यांचे दर५० रुपये किलो असल्यास त्या दराप्रमाणे भाजी खरेदी करण्यात येते. फलोत्पादन महामंडळाच्या दुकानात मात्र २० वीस रुपये किलो दराने भेंडी व चिटकी भाजी विकली जाते यात सरकारकडून तूट भरून काढण्यात येते. त्यामुळे गोव्यातील भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्य राज्यांच्या तुलनेतचांगला हमीभाव मिळतो.त्यामुळे गोव्यातील शेतकरी भाजी उत्पादनावर जास्त भर देतात व आपल्या शेतात जास्तीत जास्त भाजीचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात

गोव्यातील शेतकरी भाजी उत्पादनात गोवा राज्यस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गोव्यातील अग्रेसर शेतकरीनागेश सामंत, प्रसाद वेळीप,इनॅसिओ फर्नांडिस, रजत प्रभू, मिलिंद पिळगावकर, प्रितेश पाटील, दु मिंगो कोस्ता, जोशी पराग, महेश गावकर, आगस्टोनो फिगरो दरवर्षी सुमारे ६० लाख ते १० लाख रुपयापर्यंत भाजीचे उत्पादन घेत आहेत.

कृषी खाते व फलात्पादन महामंडळातर्फे गोव्यातील विविध भागात शेतकऱ्याकडून सुमारे २५ प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. भेंडी व काकडी भाजी प्रथम क्रमांकावर आहे. वांगी, चिटकी, हिरवी मिरची, आले, दुधी भोपळे या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर गोव्यातील शेतकरी घेत आहेत. या भाज्यांमध्ये गोवा स्वयंपूर्ण असून सुमारे१ हजार ५०० टन गोव्यातील भाजी यावर्षी बेळगाव मार्केट मध्ये विकण्यात आली आहे.

फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले की यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीचे उत्पादन घेतले आहे फलोत्पादन महामंडळाकडून सर्वेक्षण करून दर दिवशी कोणत्या शेतकरी किती भाजी उपलब्ध करून देणार याचे सर्वेक्षण करून योग्य नियोजन करण्यात येत आहे. गोवा राज्यासाठी लागणारी भाज्यांची आकडेवारी काढून.

जास्त असलेली भाजी बेळगाव भाजी मार्केट मध्ये पाठवण्यात येते. त्यामुळे गोवा राज्याचा भाज्यांच्या मागणीप्रमाणे भाजी पुरवठा दर दिवशी करण्यात येतो. जास्त असलेली भाजी बेळगाव भाजी मार्केटमध्ये पाठवण्यात येते. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भाजी उत्पादन घेणारे शेतकऱ्यांना कोणतेच नुकसान होत नाही योग्य वेळी योग्य बाजारपेठ मिळाल्यामुळे फलोत्पादन महामंडळाकडून योग्य काळजी घेण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी कोणतीच मेहनत घ्यावी लागत नाही. शेतकरी दर दिवशी उत्पादन केलेल्या भाज्या फलोत्पादन महामंडळाच्या विक्री कार्यालयात देतात प्रत्येक महिन्याला फलोत्पादन महामंडळाकडून शेतकऱ्यांना भाज्यांची योग्य किंमत देण्यात येते

गोव्यातील शेतकऱ्यांना भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी फलोत्पादन महामंडळाकडून प्रोत्साहन देण्यात येते

असे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

गोव्यात टोमॅटो, बटाट व कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी कृषी खात्यातर्फे अनेक प्रयोग करण्यात येत आहेत या भाज्यांना वातावरण निर्मिती सुपीक जमीन तयार करून या भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत

गोवा राज्यासाठी दर दिवशी लागणारी, टोमॅटो, व कांदे बेळगाव भाजी मार्केट मधून खरेदी करण्यात येते बेळगाव भाजी मार्केटच्या दराने फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर विकले जातात. गोवा सरकारकडून भाज्यांचा दर स्थिर ठेवण्यासाठी गोवा राज्यातील मागणीप्रमाणे या भाज्यांची अन्य राज्यातून खरेदी केली जाते.

हिवाळ्यात टोमॅटो,बटाट व कांदे या भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी गोव्यातील शेतकऱ्या तर्फे प्रयोग करण्यात येत आहेत. गोवा राज्याला बेळगाव भाजी मार्केट जवळ असल्यामुळे या भाजी मार्केट मधून मोठ्या प्रमाणावर गोवा राज्यासाठी लागणाऱ्या भाजीची खरेदी केली जाते. संपूर्ण गोव्यात फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर ग्राहकांना योग्य दरात विकली जाते. सर्वसाधारण सर्व भाज्यांचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे फलोत्पादन महामंडळाचेव्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले

(श्रीराम चारी )

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment