कोर्जुएम केबल ब्रिजच्या मेन्टेनन्स काम करण्यासाठी अडचण काय? स्थानिक नागरिकांचा सवाल.
गोव्यामध्ये सरकारी कामाचे स्वरूप म्हणजे “सरकारी काम सहा महिने थांब” असे झालेले दिसत आहे. कोर्जुएम केबल ब्रिज मेन्टेनन्स चे काम गेले काही महिन्यापासून सुरू आहे. गेले काही महिने ब्रिजचे पेंटिंग चे काम सुरू होते, पण ऐन पावसाळा तोंडावर आला तरीही एक काम पूर्ण झालेले नाही. ब्रिजच्या फॅब्रिकेशन चे काम अत्यंत दूर अवस्थेत असल्यामुळे स्थानिक आमदाराने व सरकारने त्वरित त्याकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे मत आहे. ब्रिजच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी पाइपा काही ठिकाणी निखळून कोसळलेले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षे खातीर याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. पी डब्ल्यू डी खात्यामध्ये जाऊन काही नागरिकांनी याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले असता संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर देखील उडवाउडवीची होती त्यामुळे या ब्रिजचे काम लवकरात लवकर व्हावे याकरिता स्थानिक आमदार यांनी जातीने लक्ष घालावे असे नागरिकांचे मत आहे.











