ताज हॉटेल आणि छ. शिवाजी महाराज विमानतळावर बॉम्ब ठेवण्याची धमकी.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी शहरातील ताज हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांना फोन आला. यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी शोध घेतला.
मुंबई पोलिसांना ताज हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि छ. शिवाजी महाराज विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी, बॉम्ब शोधण्याची मोहीम सुरू केली. पण कोठेच काही सापडले नाही. आता ज्या व्यक्तीने फोन केला होता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.











