दिनांक 27 मे रोजी शिवोलीमध्ये सॅमसंग गॅलरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यामध्ये गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानवडे, शिवोली आमदार डिलायला लोबो व माजी आमदार दयानंद मांद्रेकर उपस्थित होते गोव्यामध्ये सॅमसंग गॅलरी चे भव्य असे शोरूम शिवोली मध्ये सुरू होत आहे. सॅमसंग ब्रँडचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंग ब्रँडच्या सर्व वस्तू एका छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम श्री आर्यन दिवे यांनी गोवेकरांसाठी केले आहे. तरी या संधीचा लाभ सर्व गोवेकर यांनी घ्यावा.











