1जून रोजी 57 जागांवर होणार मतदान.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा गोंगाट गुरुवारी संध्याकाळी थांबला. यामध्ये चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील 1 लोकसभा जागा, पंजाबमधील सर्व 13, हिमाचल प्रदेशातील चार, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा आणि झारखंडमधील तीन जागांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 486 जागांवर मतदान झाले आहे. 4 जूनमध्ये मतमोजणी होणार आहे.











