निवडणुकीच्या निकालापूर्वी महामार्गावरील प्रवास आता महागणार, आजपासून टोल टॅक्सचे दर वाढणार.
आता हायवे वापरणाऱ्या वाहनचालकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोमवारपासून देशभरातील रोड टोल टॅक्सचे दर सरासरी ५ टक्क्यांनी वाढणार आहेत.
निवडणूक निकालापूर्वी सरकारने महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. आता महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना सोमवारपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सोमवारपासून देशभरातील रोड टोल टॅक्सचे दर सरासरी ५ टक्क्यांनी वाढणार आहेत. महामार्ग वापरकर्ता शुल्काची वार्षिक सुधारणा यापूर्वी १ एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र निवडणुकीमुळे ते थांबले. वार्षिक सुधारणा सरासरी पाच टक्क्यांच्या श्रेणीत असण्याची शक्यता आहे.











