नेतन्याहू यांनी मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केले, ‘भारत-इस्रायल संबंध आणखीन मजबूत होतील.
भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयावर इस्रायलनेही प्रतिक्रिया दिली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
नेतन्याहू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर म्हणाले की, निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. ते म्हणाले, “भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री नवीन उंचीवर जावी अशी माझी इच्छा आहे. अभिनंदन.”
1992 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होते. जुलै 2017 मध्ये त्यांनी इस्रायलला भेट दिली. नंतर त्यांनी वेस्ट बँकलाही भेट दिली आणि पॅलेस्टाईनसोबतच्या भारताच्या संबंधांवर लक्ष केंद्रित केले.










