लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार भारताचे पुढील लष्करप्रमुख.
भारताचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. आता केंद्र सरकारने नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे नवे प्रमुख असतील.
भारतात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय लष्करालाही नवा नेता मिळाला आहे. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना भारतीय लष्कराचे नवे लष्करप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. उपेंद्र द्विवेदी 30 जूनच्या दुपारपासून भारतीय लष्कराची कमान सांभाळतील. भारताचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. आता त्यांची जागा उपेंद्र द्विवेदी घेतील.










