माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते बॉडी बिल्डर गौरेश विष्णू किंलेकर यांचा सत्कार.
माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते बॉडी बिल्डर गौरेश विष्णू किंलेकर यांचा दक्षिण आशिया बॉडी बिल्डर स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्या बदल सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमादरम्यान, बाबू आजगावकर यांनी ‘एका दगडात दोन पक्षी मारले’ एक म्हणजे गौरेश किंलेकर यांना मिळालेले दक्षिण आशिया स्पर्धेतील यश याचा सत्कार करून, पेडण्यातील जनतेला एक संदेश दिला, की मी अजून तुमचाच आहे. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा 2027 च्या निवडणुकीमध्ये, निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
यावरून जनतेला दिसून आलं की, एक गौरेश किंलेकर बॉडी बिल्डरची स्पर्धा जिंकून आला. व दुसरा म्हणजे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे 2027 च्या विधानसभा बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेची तयारी, आतापासून सुरू करत आहेत. असा संदेश पेडणे च्या जनतेमध्ये गेलेला असून, येणाऱ्या काळामध्ये विधानसभा बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकू शकतो का? हे येणाऱ्या काळातच पाहावे लागेल.










