G-7 मधील अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची मालमत्ता जप्त करण्याचा घेतला निर्णय..!

👇Click and Listen

G-7 मधील अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची मालमत्ता जप्त करण्याचा घेतला निर्णय..!

G-7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुतिन युक्रेनवरील हल्ल्याची भरपाई देईपर्यंत युरोपसह अमेरिका त्यांच्या देशांतील त्या रशियन संपत्ती जप्त करेल. G-7 परिषदेदरम्यान अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्णयाने रशियाचे अध्यक्ष पुतिन चिंतेत पडले आहेत.

2 वर्षांहून अधिक काळ सातत्याने युक्रेनवर हल्ले करणाऱ्या रशियाविरोधात यावेळी G-7 देशांनी अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार मॉस्को युक्रेनवरील हल्ल्याची भरपाई देत नाही तोपर्यंत रशियाची मालमत्ता गोठवण्याचे अमेरिका आणि युरोपीय देशांनी मान्य केले आहे.

हा निर्णय रशियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने रशियावर 300 हून अधिक नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. यामुळे रशियाच्या आर्थिक स्थितीला थेट फटका बसला. आता जी-7 मधील अमेरिका आणि युरोपने रशियन मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेऊन पुतीन यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment