सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा शाळा व्यवस्थापनातर्फे सन्मान.

👇Click and Listen

सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा शाळा व्यवस्थापनातर्फे सन्मान

देऊळवाडा मांद्रे येथील सरकारी प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस आल्याने पालक आणि शिक्षकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र ही भीती त्यांनी मांद्रे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्याकडे व्यक्त केली असता त्यांनी पुढाकार घेऊन छप्पर बांधल्याने सरकारी प्राथमिक शाळा आणि पालक शिक्षक संघाने संयुक्तरीत्या मानचिन्ह देऊन सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्या सक्रिय कामगिरीमुळे सन्मान केला.

सरपंच नाईक यांनी स्वखर्चाने छप्पर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. दयान त्यांनी देऊळवाडा येथील पंच सदस्य राजेश मांद्रेकर यांच्या सहकार्याने दिलेला शब्द पाळून सुमारे ३ लाख रुपये खर्चून छप्पर बांधले.

याविषयी सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, शाळा विकास नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी मला आमंत्रण दिले होते आणि छप्पर कोसळण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केळी होती. मी प्रत्यक्ष जेव्हा पाहिले तेव्हा छप्पर कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती होती. त्यावेळी मी स्वखर्चाने ही जबाबदारी उचलून शिक्षक आणि विध्यार्त्यांची सुरक्षा निश्चित केली होती.

छप्पर बांधकामात देऊळवाडा येथील पंच सदस्य राजेश मांद्रेकर यांनी सहकार्य केल्याची माहितीही नाईक यांनी दिली. ते म्हणाले की, मांद्रेकर आणि मी स्वतः खर्च करून हे छप्पर उभारले. प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान वाढविण्याची गरज आहे. जे अनुदान त्यांना देण्यात येते त्यात शाळा व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. माजी मुख्यमंत्री बांदोडकर यांनी उभारलेल्या सरकारी शाळांची सुरक्षितता जपून ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सरकारी प्राथमिक शाळेला आवर्जून भेट द्यावी जेणेकरून त्यांना सत्य परिस्थिती समजणार. आज सरकारी प्राथमिक शाळा कोणत्या समस्यांना सामोरे जात आहे आणि त्यासाठी सरकारकडून त्यांना कोणत्या अपेक्षा आहेत या समजण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे असे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी सांगितले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment