शांती शेटगावकर यांच्या घरावर भलेमोठे आंब्याचे झाड,70 हजार नुकसानी.
मळेकर वाडा मोरर्जी येथील शांती शेटगावकर यांच्या राहत्या घरावर भले मोठे आंब्याचे झाड पडून 70,000 रुपयाची नुकसानी झाली.
मळेकर वाडा मोरर्जी येथील शांती शेटगावकर यांच्या घरावर भले मोठे आंब्याचे झाड पडल्याची माहिती मोरर्जी पंचायतीला कळताच मोरर्जी पंचायतीने पुढाकार घेऊन आंब्याचे झाड दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पंच सदस्या तथा माजी सरपंच सुरेखा शेटगावकर माजी उपसरपंच अमित शेटगावकर सरपंच मुकेश गडेकर आदींनी घटनास्थळी जाऊन त्यांची विचारपूस केली. आणि आंब्याचे झाड पूर्णपणे तोडून घेतले .
मोरजी पंचायतीने स्वतःच पुढाकार घेऊन हे झाड मोकले केले.
अग्निशामंमन दलाची कोणत्याच प्रकारची मदत घेतली नाही .पंचायतीने पुढाकार घेतल्याबद्दल शांती शेटगावकर यांनी समाधान व्यक्त करून आपल्याला ज्या पद्धतीने नुकसानी झाली आहे. त्याची नुकसान भरपाई निदान आता सरकारने तरी द्यावी अशी मागणी केली.
नुकसानी झाली त्यांचा पंचनामा मोर जी पंचायत तलाठी यांनी केला.
मोरजी (प्रतिनीधी) फोटो.आंब्याचे कोसळलेले झाड










