छत्तीसगड नारायणपूर मध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांना मिळाले मोठे यश.

👇Click and Listen

छत्तीसगड नारायणपूर मध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांना मिळाले मोठे यश.

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.

अबुझमदच्या नक्षलवाद्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या कुतुल, फरसाबेडा, कोडामेटा या जंगलात चकमक होत आहे. या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडागाव नारायणपूर, दंतेवाडा, कांकेरमध्ये आयटीबीपी, डीआरजी (शरण आलेल्या नक्षलवाद्यांची टीम) आणि स्थानिक पोलिस दलाच्या मदतीने कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून कारवाई करण्यात येत आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment