सरपंच प्रशांत नाईक यांनी केलेली मदत आणि त्यांचे शाळेसाठीचे योगदान कौतुकास्पद.

👇Click and Listen

 

नाईकवाडा सरकारी प्राथमिक शाळेत मेटल शेड उभारल्याने पालक शिक्षक संघाकडून त्यांचे कौतुक

नाईकवाडा मांद्रे येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पावसात झेंडा वंदन करण्यास त्रास होतो तसेच रेनकोट ठेवण्यासाठी जागा नसल्याने मुलांना त्रास होत असल्याचे गाऱ्हाणे संबंधित पंच तथा सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्याकडे पालक शिक्षक संघाने मांडल्यानंतर नाईक यांनी स्वखर्चाने येथे मेटल शेड उभारली. दरम्यान सरपंचाचे अभर व्यक्त करताना ते नेहमीच आमच्यासाठी मदतीचा हाथ आल्याचे पालकांनी स्पष्ट केले.

सरपंच प्रशांत नाईक यांनी केलेली मदत आणि त्यांचे शाळेसाठीचे योगदान कौतुकास्पद असल्याने त्यांचे शिक्षक आणि पालकांनी ऋण व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका चित्र केरकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रसाद सावळ, उपाध्यक्ष तन्वी केरकर व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, मी याच प्राथमिक शाळेत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आज या शाळेला माझी गरज असेल तर मदत करणे हे माझे कर्तव्य मी समजतो. मी माझ्या कर्तव्याच्या भावनेने शाळेला मदत केली आहे आणि पुढेही भविष्यात माझ्या हातून शाळेला मदत करण्याची संधी मिळाल्यास मी टी नक्कीच करेन.

विद्यार्थ्यांना पावसात रेनकोट ठेवण्यासाठी जागा नव्हती आणि तसेच त्यांनी सायकल आणली तर ती ठेवण्यासही अडचण होत होती. तसेच झेंडा वंदन करताना पाऊस आला तर राहण्यासाठी जागा नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडत होती. ही समस्या मला सांगितल्यानंतर त्यांना मदत करणे माझे कर्तव्य होते जे मी केले असे सरपंच नाईक म्हणाले.

प्रसाद सावळ यांनी सांगितले की, शाळेत जेव्हा झेंडा वंदन व्हायचे आणि अचानक पाऊस आला तर विढ्यार्त्यांची तारांबळ उडत होती. तसेच त्यांना सायकल आणि रेनकोट ठेवण्यासाठी सोय नव्हती. त्यासाठी मेटल शेड सरपंचांनी करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

उपाध्यक्ष तन्वी केरकर यांनी सांगितले की, आजवर पंच तथा सरपंच बाळा नाईक यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. ते आमच्यासाठी मदतीचा हाथ म्हणून नेहमीच पुढे आले आहेत. अशीच त्यांची साथ आम्हाला मभवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बॉक्स करणे

नवीन बाग उपलब्ध करण्याच्या तयारीत : सरपंच

मी आणि माझे वडील देखील याच शाळेत शिकले आहेत आणि जे बाग त्यांनी वापरले तेच आज जोडून आजची पिढी वापरात आहे. ही परिस्थिती खरंच दुर्दैवी आहे. सरकार त्यांना १० हजार रुपये अनुदान देतो आणि त्यामध्ये शाळेचे व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. आज आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन नवीन बाग मुलांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तयारी केली असल्याचेही सरपंचांनी सांगितले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment