रुद्रप्रयाग मध्ये मिनी बस 660 फूट खाली कोसळून 14 जणांचा मृत्यू.

👇Click and Listen

रुद्रप्रयाग मध्ये मिनी बस 660 फूट खाली कोसळून 14 जणांचा मृत्यू.

जखमींवर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरू आहेत. नदीत पडल्याने कुणाच्या डोक्याला दुखापत, दुसऱ्याला हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. उत्तराखंड च्या मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शनिवारी एम्स ऋषिकेशला पोहोचून अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री जखमींवर उपचाराबाबत एम्सचे डॉक्टर त्यांच्याकडून माहिती घेतली व जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून मिनी बस जात होती. या ट्रेनमध्ये 26 प्रवासी होते. मात्र आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच ही मिनी बस रस्त्यावरून घसरली आणि सुमारे 660 फूट खाली अलकनंदा नदीत पडली.

26 प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी झोपले असल्याचे बोलले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून चोपटा-तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकिंगसाठी 26 प्रवाशांचा ग्रुप निघाला होता. बद्रीनाथ महामार्गावर चालकाला झोप लागल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment