उपविभागीय पोलिस ऑफिसर्स पेडणे गोवा, येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
श्री दत्त परमनाभ पीठ आणि सद्गुरु योग गुरुकुल यांच्या सहकार्याने, उपविभागीय पोलिस ऑफिसर्स पेडणे गोवा, येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांनी, योग बद्दल माहिती सांगितली व योग रोज अर्धा तास का करावा? यामुळे काय फायदे होऊ शकतात याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. योग आणि आरोग्य हे एकमेकांशी संलग्न अशा गोष्टी आहेत, की जेणेकरून माणसाला चांगलं आयुष्य जगता यावं याकरिता योग हा अतिशय महत्त्वाचा असतो डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयव व्यवस्थित चालण्याकरिता योग हा अतिशय महत्त्वाचा आहे पोलिसांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला अर्धा तास योग साठी द्यावा असे त्याने आवर्जून सांगितले.











