मालपे, पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग 66, च्या बाजूला असणारी संरक्षण भिंत कोसळली, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

👇Click and Listen

मालपे, पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग 66, च्या बाजूला असणारी संरक्षण भिंत कोसळली, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग 66 च्या बाजूला, असणारी संरक्षण भिंत कोसळल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. भिंत अल्टो कार वरतीच पडली असती, पण सुदैवाने थोडक्यात कार व आतील लोक यांचा बचाव झाला. म्हणतात ना “देव तरी त्याला कोण मारी”. अशी काहीशी घटना आज महामार्ग 66 वरती घडलेली आहे.

याच महामार्गावर ही संरक्षण भिंत धोक्यात असल्याचे बातमी, एका महिन्यापूर्वी आम्ही, गोवा टीव्ही 24 यावर प्रसारित केली होती. व वेळेत सरकारने याची दखल घेऊन या संरक्षण भिंतीचे काम करावे, असे सूचित केले होते पण यदा कदाचित सरकारला निवडणुकीच्या धामधुमी मध्ये, या भिंतीकडे लक्ष द्यायला जमले नसावे, आता निवडणुका संपलेल्या आहेत. तरी लोकांच्या संरक्षणासाठी या संरक्षण भिंतीचे काम लवकरात लवकर व मजबूत करावे. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये, अशी कामांमध्ये काळजी सरकारने घ्यावी.

जर एक महिन्यापूर्वी “गोवा टीव्ही 24” ने ही बातमी प्रसारित केली होती. त्याचवेळी जर सरकारने उपयोजना केल्या, असत्या तर आत्ता घडलेला अनर्थ, घडला नसता. असोत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, किंवा मोठा अनर्थ घडला नाही. आता तरी सरकारने शहाणे होऊन. या कामांमध्ये जातीने लक्ष घालावे, जेणेकरून या महामार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांची जीवन सुरक्षित होईल.

 

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment