सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत आसगाव घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा – युरी आलेमाव

👇Click and Listen

सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत आसगाव घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा – युरी आलेमाव

पूजा शर्माला २४ तासांत अटक करा – अमित पाटकर

सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत आसगाव घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा – युरी आलेमाव

पाडलेल्या घराच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस क्राउड फंडिंग करेल – एल्टन डिकोस्ता

पणजी – आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घरावर दिवसाढवळ्या बुलडोझरचा मारा करुन सदर घर पाडण्याच्या प्रकरणा भाजप सरकारने केवळ बुलडोझरचा चालक आणि तथाकथित दलालाला अटक केली, हे धक्कादायक आहे. सदर घटनेची मुख्य सूत्रधार पूजा शर्माला २४ तासांत अटक करावी अशी आमची मागणी आहे. सरकारने असे न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका बाहेरच्या व्यक्तीकडून गोमंतकीय कुटुंबाविरुद्धच्या भयंकर गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती त्वरित स्थापन करावी. आसगावचे जमीन बळकाव प्रकरण हे भाजप आश्रय देत असलेल्या जमीन आणि रिअल इस्टेट माफियांचे आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

ज्यांनी ते घर पाडले त्यांच्याकडूनच घराची दुरुस्ती करून घेण्यात सरकार अपयशी ठरल्यास काँग्रेस पक्ष क्राउड फंडिंग करेल आणि पाडलेल्या घराची दुरुस्ती करेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी पूजा शर्मा यांची सेवा घेतल्यास गोमंतकीय त्यांचे अभिनंदन करतील, असा टोला केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी हाणला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, ॲड. रमाकांत खलप, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, शिवोली गट अध्यक्षा पार्वती नागवेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्याचा समावेश असलेल्या काँग्रेस शिष्टमंडळाने आसगाव येथे आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेतली.

गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आम्ही हा मुद्दा उपस्थित करून सरकारकडे उत्तर मागणार आहोत. गोव्याच्या डीजीपीच्या भूमिकेची चौकशी व्हावी आणि या गुन्हेगारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सांगितले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment