सत्यनारायण उर्फ सॅम पित्रोदा यांची पुन्हा एकदा ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्षपदी निवड.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधाने केल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षाने त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक वादांमुळे चर्चेत आलेले सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. मात्र आता भाजप पुन्हा एकदा यावर हल्लाबोल झाला आहे.
पित्रोदा यांना पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आल्याने भाजपने पक्षावर निशाणा साधला आहे. भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून पीएम मोदींच्या पित्रोदांबाबतच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर भाजप नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत.










