के. ब. हेडगेवार विद्यामंदिरच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कारापूर सांखळी येथे लोकार्पण
डॉ. के. ब. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. के. ब. हेडगेवार विद्यामंदिर, कारापूर, सांखळी येथील नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर श्री. कृष्णराज सुकेरकर, अध्यक्ष, डॉ. के. ब. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ, श्री. मनोज सावईकर, श्री. मोहन केळकर, व्यवस्थापक अस्नोडा, अस्नोडा, श्री. राजाराम कुंडइकर, श्री. सदानंद डिचोलकर, व्यवस्थापक, श्री. सदानंद मिशाळ, मुख्याध्यापक व सौ. राधिका कामत सातोस्कर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, शैक्षणिक संस्थेने संस्कारमय शिक्षणा बरोबर नाविंनत्तंम पद्धतीचे व नवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण दिल्यास विद्यार्थी आपोआप अशा संस्थांकडे आकर्षित होतात. आपल्या पाल्यांना कोणते शिक्षण द्यावयाचे हे बऱ्याच पालकांना समजत नाही म्हणून सरकार दरबारी स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत करियर मार्गदर्शन देण्यास सुरवात केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी सारख्या ग्रामीण भागात आज केजी ते पिजी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने आपल्याला अभिमान वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेण्याचे गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सुरवातीला श्री. मनोज सावईकर यांनी प्रास्ताविक केले, सौ. प्रतिक्षा पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सदानंद मिशाळ यांनी आभार मानले.










