जम्मूच्या कठुआमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद, 5 जखमी, काश्मीर टायगर्सने घेतली हल्ल्याची जबाबदारी.

👇Click and Listen

जम्मूच्या कठुआमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद, 5 जखमी, काश्मीर टायगर्सने घेतली हल्ल्याची जबाबदारी.

कठुआच्या बदनोटा भागात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू-काश्मीर कठुआमधील बदनोटा, या परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले, तर 5 जवान अजूनही जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ भागात काश्मीर टायगर्स भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला.

काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने यासंदर्भात एक पत्रही जारी केले आहे. पत्र जारी करून त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पत्रात असे लिहिले आहे की “मुजाहिदीनने ग्रेनेड आणि स्नायपर रायफलचा वापर केला. हल्ल्यानंतर मुजाहिदीन सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले. आतापर्यंतच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 7 व्यावसायिक अधिकारी मारले गेले आणि 6 जखमी झाले. (2024-06-26) बदला शहीद झालेल्या तीन मुजाहिदीनसाठी लवकरच आणखी विध्वंसक हल्ले सुरू केले जातील.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment