मनीष सिसोदिया यांना “तारीख पे तारीख”, न्यायालयीन कोठडीत वाढ.

👇Click and Listen

मनीष सिसोदिया यांना “तारीख पे तारीख”, न्यायालयीन कोठडीत वाढ.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने वाढ केली आहे. सोमवारी मनीष सिसोदिया यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून झटका बसला आहे. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 जुलैपर्यंत वाढ केली आहे. मनीष सिसोदिया यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात होणार आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्र्यांनी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारीला आणि ईडीने 9 मार्चला दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांनी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment